मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

CM Uddhav Thackeray - Ajit Pawar - Indira Gandhi

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी माजी पंतप्रधान  इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना अभिवादन केले.

मंत्रालयातील या कार्यक्रमात  इंदिराजींच्या स्मृतिदिनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. काँग्रेसच्या प्रमुख नेत्या, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आज स्मृतिदिन आहे. इंदिरा गांधी या भारतीय राजनीतीमधील प्रमुख व्यक्ती होत्या, त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

त्यांना आयर्न लेडी ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जात असे. त्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत. त्यांनी जानेवारी १९६६ पासून मार्च १९७० पर्यंत आणि जानेवारी १९८० पासून त्यांच्या हत्येपर्यंत (ऑक्टोबर १९८४) पंतप्रधानपदाचा भार सांभाळला. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सर्वांत जास्त काळ पंतप्रधानपदाचा भार सांभाळलेल्या त्या दुसऱ्या व्यक्ती होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER