अन्नदात्याच्या न्यायासाठी लेखणी सरसावली

Farmer

कोल्हापूर :- अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या चारही सीमेवर 23 दिवसापासून न्यायासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता लेखणीही पुढ सरसावली आहे. कोल्हापुरातील चाळीसहून अधिक साहित्यीकांनी गुरुवारी एकत्र येऊन या आंदोलनात सक्रीय होऊन मातीचे ऋण फेडण्याचा निश्चय केला. नुसता पाठींबा देऊन न थांबता यात सक्रीयपणे उतरण्यासाठी चार टप्प्यात आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली.

गुरुवारी कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकार बैठक घेऊन लेखक चंद्रकुमार नलगे, आप्पासो खोत, प्रा. शरद गायकवाड,राजाभाऊ शिरगुप्पे, शिवाजीराव परुळेकर, किसन कुराडे, संजय सौंदलगे यांनी साहित्यीकांच्या वतीने भूमिका स्पष्ट केली. धनधांडग्यांच्या घशात जाण्यापासून काळ्या आईला वाचवण्यासाठी सुरु असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले शेतकऱ्यांची पोरे म्हणून नैतिक कर्तव्य आहे. साहित्यीक हा आजूबाजूच्या परिस्थितीतूनच घडत असतो. न्यायासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना यातून तोडगा काढण्याऐवजी केंद्र सरकारकडून असंसदीय पध्दतीने आंदोलन मोडून काढले जात आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही गप्प राहणे हे मानवतेच्या दृष्टीने आणि लेखक म्हणून पटणारे नाहीत. त्यामुळेच शेती आणि शेतकरी उध्वस्त होण्याापासून वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांवर भीक मागायची वेळ आणणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध म्हणून या आंदोलनात आजपासूच सक्रीय होत असल्याचे या साहित्यीकांनी स्पष्ट केले.
चौकट ०१

असे असणार आंदोलनाचे टप्पे
पहिला टप्पा : अन्यायकारक कायदे मागे घेऊन अन्नदात्याला न्याय देण्याची मागणी देणारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

दुसरा टप्पा : कोल्हापुरातील सर्व साहित्यीक राष्ट्रीपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती करणार
तिसरा टप्पा: शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोस्टकार्ड लिहून पंतप्रधानांना पाठवणार

चौथा टप्पा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार

हे साहित्यीक होणार सहभागी

डॉ. सुनिलकुमार लवटे, चंद्रकुमार नलगे, आप्पासो खोत, डॉ. जयसिंगराव पवार,डॉ. राजन गवस, राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. शरद गायकवाड, डॉ. रविद्र ठाकूर, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. रणधीर शिंदे, प्रा.गोमटेश पाटील, राजन कोनवडेकर, महावीर कांबळे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अरुण शिंदे, प्रा. ए.डी.कुंभार, रमेश जाधव, संजय खोचारे, रविंद्र गुरव, एकनाथ पाटील, गोविंद पाटील, शाम कुरळे, रा.तू.भगत, रजनी हिरळीकर, अशोक पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, चंद्रकांता निकाडे, जीवनराव साळोखे, डॉ. मारुती गुरव, विश्वास सुतार, परशराम आंबी, निलम माणगावे, राजंद्र पाटील, मनोहर मोहिते, संजय मगदूम, संजय सौंदलगे, डॉ. राजेंद्र कुंभार, दिनकर पाटील, सुभाष विभुते, बा.स.जठार, टी.आर.गुरव, जुई कुलकर्णी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER