शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटिव्ह राहतील, पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह

Sharad Pawar

धुळे :- “शरद पवार (Sharad Pawar) एकवेळ कोरोनाबाबत निगेटिव्ह राहतील. मात्र, धनगर आरक्षणाविषयी ते पॉझिटिव्ह आहेत, असे वक्तव्य धनगर समाज महासभेचे अध्यक्ष अण्णा डांगे (Anna Dange) यांनी केले. ते धुळ्यात धनगर समाज महासभेच्या अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली.

सध्या धुळ्यात धनगर समाज महासभेचे दोन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी बोलताना एकवेळ कोरोनाबाबत (Corona) शरद पवार निगेटिव्ह राहतील. मात्र, धनगर आरक्षणबाबत ते पॉझिटिव्ह आहेत. महाविकास आघाडी सरकार धनगर समाजाला न्याय देईल, असे अण्णा डांगे म्हणाले. तसेच, धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, धनगर आरक्षणच्या प्रश्नासंदर्भात पुढील दिशा आज ठरणार आहे.

ही बातमी पण वाचा : खडसेंकडून पवारांना मिळणार वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट, मोर्चेबांधणीला सुरूवात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER