काँग्रेसचा घराणेशाही, सरंजामशाहीमुळे पराभव-अंजलीताई आंबेडकर

मुस्लिम, दलित, आदीवासी मतदार काँग्रेसपासून दुर होत आहेत याचे काँग्रेसनेच आत्मपरिक्षण करावे 

Anjalitai Ambedkar

नांदेड / प्रतिनिधी :- सत्तेपासून आपल्या अधिकारापासुन वंचित असणार्‍या समाजासाठी आम्ही लढत असून राज्यातील वंचित समाज एकत्र आल्यास संपूर्ण महाराष्ट्रात वंचितांची सत्ता येणार आहे. काँग्रेसचा घराणेशाही-सरंजामशाहीमुळे पराभव होत असुन नांदेड येथील जनता फारुक अहमद सारख्या सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्त्याच्या पाठिशी राहून विधानसभा निवडणूकीत विजयी करण्याचे आवाहन अंजलीताई आंबेडकर यांनी केले.

ही बातमी पण वाचा:- साताऱ्यातून उदयनराजे २ लाख मतांनी पराभूत होतील – पृथ्वीराज चव्हाण

नांदेड दक्षिण मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार फारुक अहमद यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 13 रोजी प्रचारसभेत ते बोलत होत्या. यावेळी बोलताना अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, संघ-भाजपाच्या संविधानविरोधी भुमिकेस ठामपणे बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केला आहे. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र अस्तित्व असलेले स्वाभिमानी व्यक्तीमत्व असल्याने त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या छायेखाली गेले नाहीत. काही पोटभरू राजकारण्यांनी वंचित आघाडीस बी टिम असल्याची बतावणी केली. परंतू आज मुस्लिम, दलित, आदीवासी मतदार काँग्रेसपासूम दुर होत आहे याचे आत्मपरिक्षण त्यांनी करावे असा सल्ला दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राजकीय कृतीत उतरवण्याची खरी वेळ आलेली आहे. आंबेडकरी समाज विखुरला गेल्यामुळे आंबेडकर भवन पाडण्यात आले, भिमा-कोरेगाव घडविण्यात आले. त्यानंतर राज्यात आंबेडकरी समाज एकवटल्याने जी ताकद निर्माण झाली. त्याची धास्ती आज भाजप-शिवसेना सह काँग्रेसला वाटायला लागली आहे. सत्तेपासून आपल्या अधिकारापासुन वंचित असणार्‍या समाजासाठी आम्ही लढत असून राज्यातील वंचित समाज एकत्र आल्यास संपूर्ण महाराष्ट्रात वंचितांची सत्ता येणार आहे. वंचित बहूजन आघाडीच्या जाहिरनामा बनविण्यासाठी मेहनत घेणार, राज्य प्रवक्ता म्हणून प्रसारमाध्यमांत वंचितांची बाजू मांडणारे, सच्चे आंबेडकरवादी फारुक अहमद यांना विजयी करण्याचे आवाहन अंजलीताई आंबेडकर यांनी केले. अंजलीताई आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने महिला, नागरीक उपस्थित होते.