‘अनिता भाभी’चे पुनरागमन उत्साहात साजरे

सोम्या टंडन पुन्हा मालिकेत दिसणार

Saumya Tandon

मुंबई :- ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतून ४ महिन्यांपूर्वी गायब झालेली सौम्य टंडन पुन्हा मालिकेत परत आली आहे. तिचे मालिकेतील पुरागमन, मालिकेतील तिच्या सहकाऱ्यांनी उत्साहाने साजरे केले.

सौम्या मालिकेत परतल्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तिने बाळन्तपणासाठी ४ महिने सुट्टी घेतली होती. सौम्याला ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

सौम्याने स्वत:च्या सोशल अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिचे सह कलाकार तिचे स्वागत करताना दिसत आहेत.

“तुम आए तो आया मुझे याद गली में आज चांद निकला.” गण्याणं सौम्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
सौम्याने २०१६ मध्ये मित्र सौरभ देवेंद्र सिंह याच्याशी लग्न केले. लग्ना आधी २ वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. २० जानेवारी २०१९ रोजी सौम्याने गोंडस मुलाला जन्म दिला.