अनिल परबांच्या रिसॉर्टची दिल्लीतील यंत्रणांमार्फत लवकरच चौकशी; सोमय्यांचा दावा

Anil Parab - Kirit Somaiya

मुंबई :- परिवहन मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, परब यांनी लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटींचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. याबाबत भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांची भेट घेत परब यांच्याबाबत एक तक्रार केली. जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टची दिल्लीतील यंत्रणांमार्फत चौकशी होणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी (Ratnagiri) येथील दापोली येथे १० कोटींचा (काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, महसूल मंत्रालयाकडे ही मी तक्रार केली आहे.’ असं ट्विट करत सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिलं आहे. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता, सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर सडेतोड उत्तर देऊ, असं अनिल परब म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button