अनिल परब यांनी सरकारी जमिनीवर केलेले अनधिकृत बांधकाम कधी पाडणार? – किरीट सोमय्या

Kirit Somiya & Anil Parab

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी म्हाडाच्या जागेवर अवैध कब्जा करून अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत खुद्द ठाकरे सरकारने हे बांधकाम पाडण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्यातच दिले होते. त्या अनुषंगाने म्हाडाच्या अध्यक्षांनी कारवाई करण्याचे पत्र सचिवांना दिले होते. मात्र अद्यापही त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. आता अनिल परब यांनी सरकारी जमिनीवर केलेले अनधिकृत बांधकाम कधी पाडणार, असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आरोप करताना सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, अनिल परब यांनी म्हाडाच्या जागेवर अवैध कब्जा करून अनधिकृत बांधकाम केले हे उघड झाले. हे बांधकाम पाडण्यासाठी आदेशही काढण्यात आले होते. मात्र आद्यपही त्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करत कारवाई रोखली तर नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी एकदा आदेश निघाल्यानंतर दुसऱ्यांदा कुठलीही हालचाल झाली नाही. एकप्रकारे ठाकरे सरकार परब यांचा बचाव करत आहे. असा आरोपही त्यांनी केला.

तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी भागातील एसआरए सोसायटीतील फ्लॅट बळकावल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी. याबाबत आम्ही बीएमसी आणि एसआरएकडे कारवाईची मागणी केली. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. हे ठाकरे सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER