अनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच हातोडा, किरीट सोमय्यांचा दावा

kirit somaiya - anil parab - Maharashtra Today

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. सध्या अनिल परब यांच्याविरोधात ६ वेगवेगळ्या प्रकरणांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. यामध्ये आता दापोली रिसॉर्ट प्रकरण परब यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या संदर्भात भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मोठा दावा केला आहे. अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

काही दिवसांपुर्वी किरीट सोमैय्या यांनी दापोलीला जाऊन महाराष्ट्र जमीन महसून अधिनियम कलम ४५ अंतर्गत तक्रार केली आहे. तसेच आता येत्या २ दिवसांत पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी साई रिसॉर्टला भेट देणार असल्याची माहिती किरीट सोमैय्या यांनी दिली आहे. परब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोगय करुन सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत अनिधिकृत रिसॉर्ट बांधला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी येत्या २ दिवसांत अनिल परब यांच्या रिसॉर्टला भेट देणार आहेत. दिल्लीत या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. कोस्टल झोन ॲथॉरिटीच्या प्राथमिक अहवालानुसार साई रिसॉर्ट एनडीझेड(नो-डेव्हलपमेंट झोन) मध्ये रिसॉर्ट बांधण्यात आहे. त्यामुळे या रिसॉर्टवर हातोडा मारण्यात येईल, असा दावा सोमैय्या यांनी केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button