अनिल परब फक्त दोन महिन्यांचे सोबती, मंत्रिपदावरून गच्छंती अटळ; सोमय्यांचा दावा

kirit somaiya - anil parab - Maharastra Today

ठाणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याबाबत खळबळजनक विधान केलं आहे. अनिल परब हे फक्त दोन महिन्यांचे सोबती आहेत. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, त्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या बदलापूरमध्ये रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. यावेळी सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब मंत्रिमंडळात केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप केले गेले आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे आता दोन महिन्यांचे पाहुणे असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

यावेळी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सोमय्या यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. ठाकरे सरकार निव्वळ बनवाबनवी आणि फसवाफसवी करण्यात तरबेज आहे. त्यांनी मराठा समाजाची मोठी फसवणूक केली आहे. अंतर्गत मतभेदामुळे ठाकरे सरकार मराठा आरक्षणाची बाजू कोर्टात व्यवस्थित मांडू शकले नाही. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं, असं सांगतानाच केंद्र सरकार आणि भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूनं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे सरकारने (Thackeray Government)कोरोना (Corona) मृत्यूचा आकडा लपवला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. एप्रिल महिन्यातील कोरोनाचे मृत्यू आणि त्यांची आकडेवारी यात मोठी तफावत आढळून आली आहे. एकट्या सोलापूरमध्ये एप्रिल महिन्यात १६०० मृत्यू झाले; पण त्यातले फक्त ४०० मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचं दाखवण्यात आलं. यामध्ये मोठा घोळ झाला असून आपण राज्यातल्या १३ महानगरांमध्ये फिरून ऑडिट करून हा घोळ समोर आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाकरे सरकार कोरोनाच्या काळात फक्त भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button