अनिल परबांच्या अडचणीत वाढ; रत्नागिरीतील रिसॉर्टसंदर्भात चौकशी सुरू

Anil Parab

रत्नागिरी :- पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, साई रिसॉर्ट बांधकामप्रकरणी अनिल परब यांची चौकशी सुरू झाली आहे. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी समिती नेमून अनिल परब यांच्या साई रिसोर्ट बांधकामप्रकरणी अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यासंबंधी लेखी तक्रार दाखल केली होती. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. अनिल परब यांच्या या रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम झाले आहे, असा आरोप केला आहे. इतकेच नाही तर परब यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानुसार आता चौकशीचे आदेश देण्यात आले असून परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ही बातमी पण वाचा : अनिल परब यांच्या रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाची होणार चौकशी – किरीट सोमय्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button