
मुंबई :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ‘सामना’तून आपल्यावर गलिच्छ भाषेत टीका होत असल्याविषयी थेट रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे. आता शिवसेनेकडून (Shivsena) त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘सामना’मधून गलिच्छ टीका झाली, असे म्हणणे योग्य नाही. ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली जाते, असे शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) म्हणाले आहेत .
ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचे खंडन केले. ‘सामना’मधून मला वाटत नाही कोणती गलिच्छ टीका होते. ‘सामना’ची विशिष्ट शैली आहे, सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते. ती भाषा गलिच्छ नसते, असे परब यांनी म्हटले.
ही बातमी पण वाचा : माझ्याविरुद्ध गलिच्छ भाषेत लिखाण ; चंद्रकांतदादा लिहिणार थेट रश्मी ठाकरेंना पत्र
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला