राज्यपालांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनासोबत 12 आमदारांबाबतही निर्णय घ्यावा : अनिल परब

Anil Parab - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : राज्यपालांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनासोबत 12 आमदारांबाबतही काळजीने निर्णय घ्यावा, असा टोला राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना लगावला. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 रिक्त जागांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल विरुद्ध सत्ताधारी वाद रंगला असतानाच परब यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत जशी काळजी दाखवली तशीच काळजी दाखवत विधान परिषदेच्या रिक्त 12 जागांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.

अनिल परब म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पूर्वी ठरलेला 3 आठवड्यांचा कार्यक्रम आजच्या बैठकीत सादर करण्यात आला. अधिवेशनाचे कामकाज कसे चालेल यावर देखील चर्चा झाली. 25 फेब्रुवारीला पुन्हा एकदा संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम ठरवला जाईल. अधिवेशनाबाबत राज्यपालांचे पत्र आले आहे. निवडणूक कुठल्या दिवशी घ्यायची हे कॅबिनेटच्या बैठकीत ठरेल. राज्यपालांनी जशी अर्थ संकल्पीय अधिवेशनाबाबत काळजी दाखवली त्याचप्रमाणे काळजी दाखवत विधान परिषदेच्या 12 रिकाम्या जागांवर अधिवेशनाआधी निर्णय घ्यावा.

रिक्त पदांसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल आणि मग तो निर्णय राज्यपाल यांना कळवण्यात येईल. राज्यपालांनी घटनात्मक विचार आणि काळजी व्यक्त केली. त्यांना आम्ही विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांची आठवण करून देतो. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. अधिवेशनास संदर्भातील विषय देखील सांगण्यात आले आहेत. सरकार कुठल्याही चर्चेला घाबरत नाही. कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्यावर चर्चा झाली. अधिवेशनाच कामकाज हे दोन टप्प्यात होईल. 25 फेब्रुवारीला पुन्हा बैठक होईल, त्यात अंतिम निर्णय होईल. अर्थसंकल्प 8 मार्चला मांडण्याचं ठरलं आहे. पण अंतिम निर्णय 25 फेब्रुवारीला होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER