५० वर्षांचे झाले अनिल कुंबळे, त्यांच्या कारकिर्दीतील हे आहेत उत्तम क्षण

अनिल कुंबळे (Anil Kumble) आज ५० वर्षांचे झाले आहे. मोठ-मोठ्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या चेंडूंनी गुडघे टेकण्यास भाग पाडले. कुंबळे हे भारताचे सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होते, ते भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च गोलंदाज (६१९) आहे. कुंबळे हे एकमेव भारतीय गोलंदाज आहे ज्यांनी डावात सर्व १० विकेट्स घेतल्या आहेत. १९९० मध्ये कुंबळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एकदिवसीय स्वरूपात सुरुवात केली. भारतासाठी १८ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर कुंबळे यांनी २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

कुंबळे यांनी श्रीलंकेविरुद्ध १९९० मध्ये शारजाह मैदानावर कारकिर्दीची सुरूवात केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी २७१ सामन्यात २३७ बळी घेतले आणि त्यांची इकॉनॉमीदेखील अवघ्या ४.३० अशी होती. कुंबळे यांनी आपल्या करिष्माई गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये बऱ्याच सामन्यांमध्ये संघ मिळवून देण्यास मदत केली. १९९३ मध्ये खेळल्या गेलेल्या हिरो चषक सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध भक्कम गोलंदाजी करताना त्यांनी ६ विकेट घेतल्या आणि एका वेळी १०१ धावांवर ४ गडी गमावून, मजबूत कॅरेबियन संघाचा डाव १२३ धावांवर सर्वबाद झाले. कुंबळे यांच्या कामगिरीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मान्यता मिळाली आणि त्यानंतर जे घडले ते इतिहास बनले.

कुंबळे वनडेमध्ये तितके यशस्वी नाही झाले जितके ते कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाले, म्हणूनच ते एक उत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातात. १९९० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात कुंबळे यांनी केली होती. क्रिकेटच्या या प्रदीर्घ स्वरुपात जम्बो (कुंबळे) यांनी भारताला बर्‍याच आठवणी दिल्या आहेत. १९९९ मध्ये कुंबळे यांनी फिरोजशाह कोटलाच्या मैदानावर हे दाखवून दिले, ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात सर्व १० विकेट्स त्यांच्या नावावर झाल्या. ४२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाक संघ १०१ धावांवर एकही बळी न गमावता खेळत होता, पण कुंबळे यांनी एकापाठोपाठ एक पाकिस्तानी फलंदाजांना पॅव्हेलियन पाठविण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण संघाला कुंबळे यांनी सर्वबाद केले आणि भारताने हा सामना २१२ धावांनी जिंकला.

कुंबळे हे टीममॅन होते जे प्रत्येक परिस्थितीत संघासाठी खेळण्यास सज्ज होते आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दित होते. २००२ मध्ये अँटिगा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात चेंडू त्यांच्या तोंडाला लागला आणि त्यांचा जबडा तुटला, प्रत्येकाला असा समज होता की कुंबळे दुसर्‍या डावात गोलंदाजी करू शकणार नाहीत. दुसर्‍या डावात गोलंदाजीसाठी कुंबळे बाहेर आले आणि सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि त्यांनी १४ षटकांचे स्पेल फेकून ब्रायन लाराची विकेटही घेतली. प्रत्येकजण त्यांच्या क्रिकेट आणि संघावर असलेल्या प्रेमाचे चाहते बनले.

कुंबळे त्या तीन फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ६०० हून अधिक बळी घेतले आहेत. आपल्या कारकीर्दीत खेळलेल्या १३२ कसोटी सामन्यांच्या २३६ डावात कुंबळे यांनी ६१९ विकेट्स घेतल्या. कुंबळे हे एक उत्तम खेळाडू होते. तुम्ही त्यांच्या कामगिरीचे आकलन क्रिकेटच्या आकड्यांमधून करू शकत नाही. आपल्या कारकिर्दीत कुंबळे यांना जो कोणी खेळताना पाहिला, तो नेहमीच त्यांचा चाहता झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER