‘यूरोप डे’ कार्यक्रमात अनिल कपूरचा होणार सत्कार

Anil Kapoor

मुंबई : मुंबईत शुक्रवारी आयोजित ‘युरोप डे’ कार्यक्रमात अभिनेता अनिल कपूर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कौन्सिल ऑफ युरोपियन चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. युरोपियन युनियनच्या स्थापनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.

युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत टॉमझ कॉझलोवस्की, युरोपियन युनियनचे ज्येष्ठ प्रतिनिधी आणि भारताच्या उद्योग जगतातील व्यक्ती या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत.अनिल कपूर यांचा – बालकांच्या अधिकारांचे रक्षण, युरोपियन युनियन आणि भारतात मुलीच्या अधिकाराबाबत काम यासाठी सत्कार करण्यात येणार आहे. युरोपच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, युरोपीय देशातील ज्या ठिकाणी हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले त्या – इंग्लंड, फ्रांस, स्पेन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, इटली या देशांमधील शहरांच्या माहितीला उजाळा देण्यासोबत ग्रीस, हंगेरी, ऑस्ट्रिया, रोमानिया या देशांमधील पर्यटनस्थळांची माहितीदेखील देण्यात येईल.