महागड्या घरांचे मालक अनिल कपूर यांनी दुबईपासून ते लंडनपर्यंत लक्झरी फ्लॅटची केली खरेदी

Anil Kapoor

बॉलिवूडबरोबर अनेक दशकांपासून लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेता अनिल कपूर विलासी जीवन (Luxurious Life) जगतात. ते आपल्या शाही जीवनशैलीबद्दलही (Royal Lifestyle) चर्चेत असतात. अनिल कपूर मुंबईत आपल्या परिवारासह जुहूच्या बंगल्यात राहतात. पण तुम्हाला माहिती आहे काय की, अनिल कपूर यांच्याजवळ याव्यतिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्येही फ्लॅट्स आहेत. आज आपण अनिल कपूर यांच्या सर्व घरांची छायाचित्रे बघूया …

मुंबई

चला प्रथम अनिल कपूर यांचा मुंबईतील बंगला बघूया. अनिल कपूर मुंबईच्या जुहू भागात राहतात. इथे त्यांचा बंगलासुद्धा आहे जो खूप आलिशान (Luxurious) आहे. या बंगल्यात अनिल कपूर, पत्नी सुनीता, मुलगी रिया आणि मुलगा हर्षवर्धन यांच्यासमवेत राहतात. या घराचा लूक खूपच सुंदर आणि भव्य आहे. लिव्हिंग रूमला पारंपरिक लूक देण्यात आला आहे. याशिवाय अनिल कपूर यांच्या या बंगल्यात एक वेगळी मूवी रूम (Movie Room) तयार केली गेली आहे. जिथे आपण आरामात चित्रपट पाहू शकता. चित्रपटाच्या खोलीखेरीज घरात एक स्वतंत्र ड्रेसिंग रूमदेखील तयार केली गेली आहे, जिथनं रिया, सोनम आणि हर्षवर्धन यांचे फोटोही वारंवार समोर येत असतात. घरातल्या सर्व मुलांच्या खोल्यादेखील त्यांच्या स्वतःच्या आवडीनुसार बनवलेल्या आहेत.

कॅलिफोर्निया

अभिनेता अनिल कूपर यांचा कॅलिफोर्नियातही बंगला आहे. वास्तविक अनिल यांचा मुलगा हर्षवर्धन कॅलिफोर्नियामध्ये शिकण्यासाठी गेला होता. यावेळी अनिल यांनी कॅलिफोर्नियामधील ऑरेंज काउंटीमध्ये मुलासाठी ३ बीएचके अपार्टमेंट घेतला. या ३ बीएचके अपार्टमेंटमध्ये मागील अंगणात (Backyard) एक बीच आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार या अपार्टमेंटची किंमत दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

लंडन

अनिल कपूर यांचे लंडनमध्येही एक घर आहे. ते लंडनच्या मेफेअर (Mayfair) अपार्टमेंटमध्ये वेळ घालवताना दिसतात. केवळ अनिलच नाही तर त्यांचा मुलगा हर्षवर्धनसुद्धा येथे वेळ घालवताना दिसतो. अनिल कपूर यांना हे घर खूप आवडते. त्यांना एका जुन्या जगाचा भाग वाटतो.

दुबई

दुबईमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचे घर आहे. ‘२४’ च्या शूटिंग दरम्यान अनिल कपूर यांनी दुबईस्थित हा २-बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट डिस्कवरी गार्डनजवळील अल फुरजान येथे आहे. एका मुलाखती दरम्यान अनिल कपूर म्हणाले होते की, हे अपार्टमेंट खूप स्वस्त आहे आणि चांगल्या ठिकाणी बांधले गेले आहे. जे त्यांना खूप आवडते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER