खडसेंच्या प्रवेशानंतर अनिल गोटेंच्या आशा वाढल्या; भाजपवासी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत परतण्याचे निमंत्रण

Eknath Khadse-Anil Gote-NCP

धुळे :  वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपवासी झालेले अनेक राष्ट्रवादीचे नेते परत येण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच भाजपातून राष्ट्रवादीत आलेले अनिल गोटे (Anil Gote) यांनीही भाजपवासी झालेल्यांनी राष्ट्रवादीत परतावे अशी आशा व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसेच्या पुर्वी अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीत येऊन भाजपला धक्का दिला होता. आता हे दोन्ही नेते मिळून उत्तर महाराष्ट्रात काय राजकीय बदल घडवून आणतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्रक काढून भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

एकनाथ खडसे आणि अनिल गोटे यांच्या एकत्रित येण्याने उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे हात बळकट होण्यास मदत होणार आहे. सध्या अनिल गोटे यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद पद आहे. अनिल गोटे यांनी नुकत्याच काढलेल्या एका पत्रकात भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. (Dhule leader Anil Gote calls BJP volunteers back to NCP as Eknath Khadse joins party)

सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. येणाऱ्या काळात हेच नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आल्यास धुळे महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते कितपत प्रतिसाद देतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या ताब्यात असलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांचे दसरा मेळाव्यातले भाषण होते निर्बुद्ध बरळणे – नारायण राणे यांची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER