
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार हे शरद पवारांनी स्थापन केलेले सरकार आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या इच्छेशिवाय हे सरकार पडणार नाही. असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाव्दारे केला आहे.
विधानसभेत मोठा पक्ष ठरूनही बहुमत सिद्ध न करू शकल्याने भाजपला सत्तेच्या बाहेर व्हावे लागले. त्यामुळे ही सल घेऊन भाजपाचे नेते वाटेल तसे बरळत सुटले आहेत. अकारण बरळण्याची आणि वाचाळपणाची भाजप नेत्यांची सवय जुनीच आहे अशी टीका गोटे यांनी केली.
ही बातमी पण वाचा:- महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक
सध्या भाजपच्या एकाही नेत्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही. असंही गोटे यांनी या पत्रकात म्हटले आहे.
मात्र शरद पवारांनी स्थापन केलेले सरकार त्यांच्या इच्छेनेच पडेल. सत्तेचा गोवर्धन तसूभर हलणार नाही. भाजपचे वाचाळ महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची एक विटही हालवु शकले नाही. उलटपक्षी अकारण रोज उठून शासनावर टीका करायची.
आघाडीच्या घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरुध्द बरळत राहणे, त्यांना टिकेचे लक्ष्य करायचे, अशा नियोजनशुन्य राजकीय बालीशपणामुळे भाजपला कुणी गांभीर्याने घेत नाही, असे गोटे म्हणाले. हे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला