आयएएस अधिका-यांचे बदली सत्र सुरूच, अनिल डिग्गीकर धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे नवे विशेष कार्य अधिकारी

IAS Officers Transfers

मुंबई : महाराष्ट्र सरकारने आयएएस अधिका-यांचे (IAS officers) बदली सत्र सुरूच ठेवले आहे. या बदल्यांवरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतरही राज्यात दरदिवशी कोणत्या ना कोणत्या विभागातील आयएएस अधिका-यांचे बदली सत्र सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. आज एकूण सहा आयएएस अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत.

१. अनिल डिग्गीकर ( Anil Diggikar) यांची नियुक्ती विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प मुंबई या रिक्त पदावर

२) विवेक जॉन्सन (Vivek Johnson) अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा येथे करण्यात आली आहे.

३) अमित सैनी सहायक विक्रीकर आयुक्त मुंबई यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी पद महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ मुंबई येथे करण्यात आली आहे.

४) दीपककुमार मीना (Deepak Kumar Meena), मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम, यांची नियुक्ती जिल्हाधिकारी पदावर गोंदिया येथे करण्यात आली आहे.

५) एस. राममूर्ती (S. Ramamurthy,), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी बुलडाणा येथ करण्यात आली आहे.

६) प्रशांत नारनवरे (Prashant Naranware) यांची नियुक्ती आयुक्तपदी, समाजकल्याण कल्याण, पुणे येथे झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER