अनिल देशमुखांच्या अडचणीत पुन्हा वाढ; ED कडून निकटवर्तीयाच्या घरी छापेमारी

Anil Deshmukh - ED - Maharashtra Today

नागपूर :- १०० कोटी वसुलीप्रकरणी अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चौकशी अद्यापही कायम आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आज नागपूरमधील त्यांचे निकटवर्तीय असलेले सागर भटेवारच्या घरावर छापा टाकला आहे.

नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जवळचे मानले जाणारे व्यावसायिक सागर भटेवार यांच्या  घरी आज ईडीने धाड टाकली. भटेवार हे  नागपूर (Nagpur) येथील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून भटेवार हे देशमुखांच्या संपर्कात होते. त्यामुळेच ईडीने भटेवारच्या घरावर छापा टाकला. भटेवारची चौकशी करत काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या पथकाने जप्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सागर भटेवार हे अनिल देशमुख यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

याआधी अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. या प्रकरणात ईडीने देशमुखांवर ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने तपास करून देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. या FIR च्या अनुषंगाने सीबीआयने देशमुखांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button