अनिल देशमुख अडचणीत; चौकशीच्या मागणीसाठी परमबीर सिंग सुप्रीम कोर्टात, २६ मार्चला सुनावणी

Parambir Singh - Maharastra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप सिंग यांनी या पत्रात केला आहे. य. या पत्रावरुन आता सत्ताधाऱ्यांनी सिंग यांच्यावर उलट आरोप करायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत आता सिंग यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता या याचिकेची सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत सुप्रीम कोर्ट कुठला आदेश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. त्यासाठी गृहमंत्र्यांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणतीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे गरजेचे आहे. अनिल देशमुखांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं.

त्यापूर्वी २४ की २५ ऑगस्ट 2020 मध्ये, रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त आहेत, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कुठलीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं. मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER