अनिल देशमुखांचा सीबीआय चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा!

Anil Deshmukh - Maharastra Today

मुंबई :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याकडून १०० कोटी रुपये वसूल केल्याच्या आरोपाची सीबीआय (CBI) चौकशी सुरू आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असल्याचे उघडकीस आले आहे.

अनिल देशमुख यांची गेल्या सात  तासांपासून चौकशी सुरू आहे. आणखी काही तास ही चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावरील लावण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चुकीचे आहेत, असा दावा देशमुखांनी केला आहे. महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.

देशमुखांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल अनेक प्रश्न विचारले. पण “मला माहीत नाही, माझा काहीही संबंध नाही.” असे उत्तर त्यांनी दिले.

कारमायकल रोड गाडीप्रकरणी ATSने केलेल्या तपासानुसार परमबीर सिंग यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. डीसीपी राजू भुजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केले आहे. मी त्यांना कोणतीही वसुली करायला सांगितले नाही, असेही देशमुख म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button