अनिल देशमुखांचे पाय आणखी खोलात, मुलांच्या ६ कंपन्या सीबीआईच्या रडारवर

Anil Deshmukh

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांनी केलेल्या आरोपानंतर माही गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर लागलेल्या भरस्टाचार प्रकरणाची सध्या सीबीआयकडून (CBI) चौकशी सुरू आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुखचे पुत्र सलिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh)हयांच्या कोलकाता स्थित ज़ोडीएक डीलकाम प्रायवेट लिमिटेड कंपनीसह सहा कंपन्या सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कंपनीचा पत्ता ज़ोडीएक डीलकाम ९/१२ लाल बाजार इ ब्लॉक दूसरा मजला कोलकता असा आहे. हा पत्ता मार्केंटाईल बिल्डिंगच आहे मात्र २०१७च्या काळ्या पैसांच्या एका तपासात ह्या इमारतीत जवळपास ४०० शेल कंपन्या (बोगस कंपन्या) आढळून आल्याचा माहिती समोर आली होती. त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ कारपोरेट अफेयर्सने मोठ्या संख्येत यातल्या कंपन्या बंद केल्याहोत्या. मात्र रजिस्ट्रार आफ कंपनीच्या रिकार्ड प्रमाणे जवळपास १०० पेक्षा जास्त कंपन्या अजूनही सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यापैकी जवळपास 30 कम्पनयांच्या रजिस्टर्ड कार्यालयाचा पत्ता तोच आहे जो देशमुखंच्या ज़ोडीएक डीलकाम कंपनीचा पत्ता आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआई मार्फत सखोल चौकशी सुरू आहे.

ही बातमी पण वाचा : ‘सीबीआय’च्या ‘एफआयआर’विरुद्ध अनिल देशमुखांची हायकोर्टात याचिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button