उद्या अनिल देशमुखांची सीबीआय (CBI) चौकशी, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये खलबत

Ajit Pawar & Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पित्ताशयावर सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. बलसरा यांनी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली असून त्यांची तब्येत स्थिर आहे. दरम्यान, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांची भेट घेतली. ही भेट तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याची सांगितले जात असले तरी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची उद्या होणाऱ्या सीबीआय (CBI) चौकशीच्या पार्श्वभूमीवर झाल्याची सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर पडली आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी सीबीआयनं त्यांना समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून देशमुख यांची १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशमुख यांच्या स्वीय सहायकांची रविवारी चौकशी करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button