‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा… गृहमंत्र्यांच्या आठवलेंना खास शैलीत शुभेच्छा

Anil Deshmukh-Ramdas Athawale

मुंबई : कोरोना व्हायरस विरोधात ‘गोss कोरोना, कोरोना गोss’ अशी घोषणा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते सध्या मुंबईत उपचार घेत आहेत. रामदास आठवले लवकर बरे व्हावेत म्हणून अनेक मित्र, शुभचिंतक त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यामध्ये राज्याचे गृहमंत्रीही मागे नाहीत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी रामदास आठवलेंना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

रामदास आठवलेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास आठवले-स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. ह्या शुभेच्छा चारोळीच्या माध्यमातून दिल्या आहेत. “कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा. ” अशा खास शैलीत त्यांनी आठवलेंना शुभेच्छा दिल्या आहेत. गृहमंत्र्यांनी केलेले हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER