एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात हालचाली ; अनिल देशमुख भेटीसाठी रवाना

-शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

Anil deshmukh & Eknath Khadse

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेत आहेत. खडसे हे रावेर येथील शासकीय विश्रामगृहावर आहेत. काही वेळापूर्वीच अनिल देशमुख खडसे यांची भेट घेण्यासाठी विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आता देशमुख आणि खडसे भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान शासकीय विश्रामगृहातून हे दोन्ही नेते रावेर हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या रावेर हत्याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख जातीने रावेरमध्ये आले आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तूर्तास खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेश होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER