राजीनाम्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीत दाखल, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार?

Anil Deshmukh

नवी दिल्ली :- गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) नागपूरला रवाना होतील असं बोललं जात होतं. मात्र ते थेट दिल्लीत दाखल झाले आहेत.ते दिल्लीत कोणाला भेटणार याबाबत सस्पेंस कायम आहे. पण ही व्हीआयपी भेट असल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतात, अशीही चर्चा सध्या रंगू लागली आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा सोपवल्यानंतर अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद न साधता थेट विमानतळ गाठले होते. त्यामुळे देशमुख नागपूरला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, सायंकाळी ५ वाजताच्या विमानाने देशमुख थेट दिल्लीला गेले. तेथे ते राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सध्या आजारपणामुळे मुंबईत आहेत. यामुळे देशमुख पटेलांना भेटून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी ‘सीबीआय’ कडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button