मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर मी…; अनिल देशमुख यांचे मध्यरात्री ट्विट

CM Uddhav Thackeray-Anil Deshmukh

मुंबई :- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे चांगलेच अडचणीत सापडले आहे .

एकीकडे या आरोपांवरुन राज्यातील राजकारणात खळबळ माजली असताना दुसरीकडे परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले असून उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान अनिल देशमुख यांनी रात्री ट्विट केले आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे.

“मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते,” असे अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे.

राज्य शासनाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप लावलेत त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे मी आपणांस विनंती करतो की, त्यांनी जे आरोप लावले आहेत या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करुन ‘दूधका दूध पानीका पानी’ करावे, असे अनिल देशमुखांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : महाविकासआघाडीत  हालचालींना वेग ;  सुप्रिया सुळे सोनियांना भेटल्या, मुंबईतही नेत्यांची गुप्त बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER