अनिल देशमुख महाविकास आघाडीच्या सर्कशीतले जोकर- अतुल भातखळकर

Anil Deshmukh-Atul Bhatkhalkar

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणावरून (SSR) विरोधकांवर टीका करताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पत्रपरिषदेत म्हणाले – महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी. बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. यावर देशमुखांना टोमणा मारताना भाजपाचे आमदार म्हणाले – अनिल देशमुख (Anil Deshmukh) महाविकास आघाडी (MVA) नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत!

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट केले – गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकास आघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. याआधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे.

आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा. अनिल देशमुख यांनी नेहमीप्रमाणे भाजपावर खोटे राजकीय आरोप केले आहेत. या खोट्या आरोपांचा भाजपा तीव्र निषेध करते. जी चौकशी करायची आहे ती करा. भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस कधीच आणि कोणतेही बेकायदेशीर काम करत नाहीत,  असे भातखळकर म्हणाले. राजकारणात इतके गुरफटलेले गृहमंत्री राज्याने इतिहासात कधीच पाहिलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

अनिल देशमुख

सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. “एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआय करते आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्व जण वाट पाहात आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा, अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल, असे अनिल देशमुख म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजप नेत्याचा दावा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER