अनिल देशमुख यांनी संजय राऊतांवर बोलण्याचे टाळले , उद्धव ठाकरेंकडे मागणी केल्याची दिली आठवण

Anil Deshmukh - Sanjay Raut - Maharastra Today

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parmbir Singh) यांच्या लेटर बॉम्बमुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादंग पेटले आहे . शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील ‘रोखठोक’मधून अनिल देशमुख अपघाताने गृहमंत्री झाले अशी टीका केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी संजय राऊत यांच्यावर बोलणे टाळले आहे.

अनिल देशमुख यांना संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असताना त्यांनी सपशेल उत्तर देण्याचे टाळले. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. चौकशी केल्यानंतर खरे खोटे समोर येईल, अशी प्रतिक्रिया देऊन अनिल देशमुख यांनी काढता पाय घेतला.

तर सामानात आलेल्या रोखठोक लेखावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. सामना वृत्तपत्रात आलेल्या लेखाबद्दल आम्ही सकारात्मक घेत आहोत. त्यावर विचार करू. पण अनिल देशमुख हे 5 वेळ निवडून आलेले आहेत तसंच 18 वर्षे मंत्री होते. त्यामुळे ते अपघातामुळे गृहमंत्री झाले नाही, असा टोला नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना लगावला. तसंच, काही चूक झाल्या असतील तर त्या सुधारू, असेही नवाब मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button