“शहेनशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करतील : गृहमंत्री अनिल देशमुख

Anil deshmukh-Amitabh Bachchan

मुंबई : बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर काही वेळातच मुलगा अभिषेक बच्चन याने देखील आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विटर वर सांगितलं. अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा दिल्या आहेत .

“महानायक अमिताभ बच्चन जी हे कोरोना वर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भुमिका घेऊन परततील, “शहेनशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करुन आपल्याला “आनंद” देतील हीच सदिच्छा, असे देशमुख आपल्या ट्विट मध्ये म्हणाले .

ही बातमी पण वाचा : अमिताभ यांच्यानंतर अभिषेक बच्चनलाही कोरोना

दरम्यान अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच . कुटुंब आणि स्टाफ मधील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने त्यातील सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन, आराध्य बच्चन आणि जया बच्चन यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER