अनिल देशमुखांचे गृहमंत्रिपद जाण्याची शक्यता, जयंत पाटील रेसमध्ये

anil deshmukh - jayant patil - Maharastra Today

मुंबई :- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren death case) आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग धरला आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांना हटवण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांनि आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी सरकारवर दबावही निर्माण केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुले भाजपने सरकारची मोठी कोंडी केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर आले आहे. तसेच गृह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सचिन वाझे यांना शिवसेना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे, परंतु गृहखातं राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्यावरही चिखलफेक होत आहे.

सचिन वाझे यांचं नाव स्फोटक प्रकरणात आल्याने, गृह खात्यावर अनिल देशमुख यांचा वचक नसल्याची भावना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मनात असल्याचं बोललं जातं. दुसरं म्हणजे मुंबई पोलीस, सचिन वाझे प्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचं मनोधैर्य खचल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्त्वाचं मानल्या जाणाऱ्या गृहखात्याचा कारभार, त्यांच्याकडे देणं योग्य नाही, त्यामुळे त्यांना पदावरुन हटवून गृह खात्याचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्याकडे हे खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी हे भाकित वर्तवलं.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वरिष्ठतेच्या पातळीनुसार विचार केल्यास अजित पवारांनंतर (Ajit Pawar) जयंत पाटील यांचं नाव सर्वात वरच्या स्थानी आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा भार अजित पवारांकडे आहे. त्यामुळे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयंत पाटील सध्या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत.

ही बातमी पण वाचा : अधिकाऱ्यांच्या हातातून चुका होत असतात, घटना घडत राहतात; गृहमंत्री देशमुखांचं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER