अनिल देशमुख महत्त्वाचे नाहीत, सरकार पडण्यासारख्या गोष्टी घडताहेत – राज ठाकरे

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray

मुंबई :- अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजणारा राजकीय मुद्दा म्हणजेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा. यावर राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलणार याकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं.

पण, राज ठाकरे म्हणाले, “माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नाही, ती बॉम्बची गाडी ठेवली कुणी हा खरा महत्त्वाचा विषय आहे. विरोधक सरकार पाडायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत. मात्र सरकारमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, त्या सरकार पडण्यासाठी पुरेशा आहेत, असे म्हणत त्यांनी सूचक विधानही केले. नुकताच मला एका मित्राने मेसेज पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय? असा मजकूर त्यामध्ये होता.” राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तसेच परमबीर सिंह प्रकरणामुळे ठाकरे सरकार अपयशी ठरले असे वाटते का, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, पोलीस दलात बदल्यांसाठी बाजार भरवला जाणे ही काही नवी गोष्ट नाही. आपण सरकारला वेळ दिला पाहिजे. अनिल देशमुख पैसे गोळा करण्यासंदर्भात जे बोलले, ते लांछनास्पदच आहे. पण परमबीर सिंह यांना १०० कोटींचा साक्षात्कार पद गेल्यानंतरच का झाला, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

भाजपचे नेते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते करत असतात. पण सरकार अशा प्रकारे पडायला काय इमारत आहे का? पिलर काढले आणि सरकार पडले असे होणार आहे का? तुमचे मंत्री चुका करतात म्हणूनच विरोधकांना संधी मिळते ना, असे खडेबोल राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले.

ही बातमी पण वाचा : अनिल देशमुख दिल्लीत; सीबीआय चौकशी टाळण्यासाठी ‘या’ बड्या वकीलाची भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button