अनिल देशमुख कायद्यापेक्षा मोठे नाही; वकील जयश्री पाटील आक्रमक

Maharashtra Today

मुंबई : या राज्यात तुमची ताकद चालत नाही, तर संविधानाची ताकद चालते. ही मोगलाई नव्हे. अनिल देशमुख हे सामान्य नागरिक आणि उद्योजकांना धमकावून भ्रष्टाचार करू शकत नाहीत, अशी टीका वकील जयश्री पाटील (Jayashree Patil )यांनी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर केली.

मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai Hogh Court) सोमवारी बहुचर्चित परमबीर सिंह (Parambir Singh LetterBomb) लेटरबॉम्ब प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआय विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. “अनिल देशमुख ही मोघलाई नाही. याठिकाणी मोघली कायदे चालत नाहीत. इकडे तुमचे राज्य नसून संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कितीही धमक्या दिल्यात तरी मी मागे हटणार नाही.” असे जयश्री पाटील यांनी म्हटले.

जयश्री पाटील काय म्हणाल्या?

“आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. १५ दिवसात अहवाल द्यायचा आहे. अनिल देशमुख तुम्ही गृहमंत्री असलात तर तुमच्या अंडर महाराष्ट्र पोलीस आहे, त्यामुळे तुम्ही ही चौकशी योग्य प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे कोर्टाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे. अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझे नाव पोलीस डायरीत येऊ दिले नाही. सरन्यायाधीशांनी म्हटले आहे की, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणला आहे.

अनिल देशमुख कायद्यापेक्षा मोठे नाही

डायरेक्टर जनरल सीबीआय हे चौकशी करतील. जयश्री पाटील यांची याचिका कोर्टाने ऐकली. कोर्टाने जयश्री यांचे खूप कौतुक केले, कोणीतरी एक शूर आहे, जे समोर आले आहेत. एवढ्या मोठ्या १०० कोटीप्रकरणात कोणीतरी शूर आ,हे जे समोर आले आहेत, असे कोर्टाने सांगितल्याची माहीती जयश्री पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button