बलात्काऱ्यांना क्लीन चिट देत आहेत अनिल देशमुख; चित्रा वाघ यांचा आरोप

Chitra Wagh & Anil Deshmukh

मुंबई :  राज्यात बलात्काराच्या घटना रोज घडत आहेत. भंडाऱ्यात लहान बालकांचा मृत्य असो वा यवतमाळमधील घटना असो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्व घटना होऊनही त्या ठिकाणी फिरकलेही नाहीत. दरम्यान, भाजप नेते चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर बलात्कार करणार्‍यांना क्लीन चिट देण्याचा आरोप केला आहे.

भंडाऱ्यात डिसेंबर महिन्यात घडलेली घटना धक्कादायक होती. त्यानंतर यवतमाळमध्ये पोलिओ ड्रॉपऐवजी सॅनिटायझर दिल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये शासनाचा हलगर्जीपणा दिसून येतो. याबाबतची चौकशी समितीदेखील स्थापन केली नाही. एवढी गंभीर घटना घडूनही कसलीही कारवाई झालेली नाही. ‘एफआयआर’ दाखल झालेला नाही. केवळ पाच लाख रुपये दिल्याने काही होत आहे का? खारघरमध्ये महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाला.

पुण्यातही अशा प्रकारची घटना घडली. साताऱ्यातही मूक-बधिर मुलीवर बलात्कार झाला. पण सरकार याची दखल घेत नाही. बलात्कार किंवा महिलांवर अन्याय झालेल्या घटनांची आम्ही तत्काळ दखल घेतो. दुसरीकडे बलात्काऱ्यांना गृहमंत्री क्लीन चिट देत आहेत. सरकार बालकांचे हत्यारा आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER