अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर, १४ तारखेला सीबीआय चौकशी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत भर पडली आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी सीबीआयनं त्यांना समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून (CBI) देशमुख यांची १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशमुख यांच्या स्वीय सहायकांची रविवारी चौकशी करण्यात आली होती.

सीबीआयच्या तपास पथकाकडून रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व साहाय्यक एस. कुंदन यांची कसून चौकशी केली होती. सुमारे चार तास त्यांचा स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता १४ तारखेला देशमुख यांची चौकशी होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button