राज्यात १२ हजार ५०० पोलीस पद भरती करणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

Maharashtra Today

मुंबई : राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले .

तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्युप्रकरणातील तपासात पोलीस अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचंही मान्य केलं. आमच्या अधिकार्‍यांकडून गंभीर चुका झाल्यात. एटीएस आणि एनआयएकडून याचा तपास सुरू आहे. चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल.

विरोधी पक्षनेते सगळीकडून माहिती घेत असतात, गटबाजी प्रत्येक ठिकाणी असते, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले .काल जी बदली केली, चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या, त्या माफ करण्यासारख्या नाहीत. त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बसून आम्ही आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला. आयुक्तालयातील सहका-यांच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या म्हणून ही बदली करण्यात आली, असंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले . NIA आणि ATS च्या तपासात काही बाबी आढळल्या आहेत. परमबीर सिंग यांच्या कार्यालयाकडून काही गंभीर चुका झाल्या आहेत. त्या माफ होण्यासारख्या नसल्याचंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान राज्यात पहिल्यांदाच १२ हजार ५०० पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोरोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात ५३०० पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना १२ हजार ५०० पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER