अनिल देशमुख प्रकरण : अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा ईडीने नोंदवला जबाब

मुंबई :- अनिल देशमुख प्रकरणी (Anil Deshmukh) आज अ‍ॅड. जयश्री पाटील (Jayashree Patil) यांचा चार  तास ईडीने जबाब नोंदवला आहे. यावेळी त्यांनी ईडीला अनेक पुरावे दिले आहेत. ईडीच्या (ED) सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचा दावा अ‍ॅड. जयश्री यांनी केला आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला  महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप परमबीर सिंगांनी केला होता. या प्रकरणी अ‍ॅड. जयश्री यांनी मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची CBIने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

वसुली झालेल्यांची नावे
या प्रकरणी आज ईडीने जयश्री पाटील यांना चौकशीसाठी बोलावले होते. जयश्री या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात पोहचल्या. तब्बल चार तास त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. “मला ईडीने काही प्रश्न विचारले. ईडीच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे देऊन अनेक पुरावे दिले आहेत. ज्या लोकांकडून पैसे गोळा केले जात होते, त्यांची माहिती दिली आहे. आज चार  तास माझा जबाब नोंदवण्यात आला. परंतु, माझा जबाब आज पूर्ण झालेला नाही. मला पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल. तेव्हा मी पुन्हा ईडीला सहकार्य करणार आहे.” असे पाटील यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : अनिल देशमुख हिशोब द्या : किरीट सोमय्या 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button