देशमुख, परब झाले, आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर; किरीट सोमय्यांचा दावा

Jitendra Awhad - Kirit Somaiya - Maharashtra Today

सोलापूर :- भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पुन्हा महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर लागला असून पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा (Jitendra Awhad) असेल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या आज सोलापूरच्या दौऱ्यावर असून, पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना लक्ष्य केले. सचिन वाझेवर झालेल्या कारवाईदरम्यान पाच अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. परमबीर सिंग घरी गेले, अनिल देशमुखांवर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. आता सध्या अनिल परबांचा नंबर असून त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल. भाजप उद्धव ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल, असंही सोमय्या म्हणाले.

राज्यातील सरकारनं खुशाल पाच वर्षे पूर्ण करावी. पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करणार असल्याचं सोमय्या म्हणाले. यावेळी सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. संजय राऊत (Sanjay Raut) यांना ५५ लाख रुपये परत करण्याची वेळ आली. मुंबईच्या महापौरांनी एसआरएच्या गाळ्यांवर अवैध कब्जा केल्याचे हायकोर्टात सिद्ध झाले आहे. अनिल परब, अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत सोमय्यांनी संकेत दिले. कोरोना लसीकरणावरून मुंबईमध्ये काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे सरकारमुळं झालेल्या कोविड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत असल्याची टीकाही किरीट सोमय्या यांनी केलीय. एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लसीचा काय संबंध आहे, असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने महाराष्ट्रातील कोविड मृत्यूंची माहिती लपवली आहे. त्यामुळे भाजप येत्या काळात महाराष्ट्रातील कोविड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १३ महत्त्वाच्या शहरांमध्ये माझ्यासह आणखी दोन सीए मिळून हे ऑडिट करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. पुढे किरीट सोमय्या म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही माहिती आहे की, भारतात लसींचे उत्पादन दोन कंपन्या करतात आणि त्यातील महत्त्वाची कंपनी ही पुण्यात असून, त्याचे मालक हे शरद पवारांचे मित्र आहेत. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वर्षात १० कोटी होत असेल तर देशातील सर्व लोकांना लस मिळायला १२ महिने लागणार आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लसीचा काय संबंध आहे, असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button