पोरं निकम्मी असतात तेव्हा म्हाताऱ्या बापाला फिरावं लागतं; शरद पवारांच्या दौऱ्यांवरून भाजपचे टीकास्त्र

Ani Bonde & Sharad Pawar

बुलडाणा : भारतीय जनता पार्टीच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले . अतिवृष्टी, कांदा प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दौरे करत आहेत. पवारसाहेबांबद्दल कौतुक असले तरी पण म्हाताऱ्या बापाला का फिरावं लागतं? जेव्हा पोरं निकम्मी असतात तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं, शरद पवारांच्या दौऱ्यांमुळे हे सरकार लायकीचे नसल्याचे स्पष्ट होते.” अशी टीका  बोंडे यांनी केली.

कपटीपणा करून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले आहेत.  त्यांनी सरकार चालवून दाखवावे, असे आव्हान बोंडे यांनी दिले आहे. राज्याच्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे, हे भाजपाने कधीच म्हटले नाही. मात्र, कपटीपणाने सत्तेवर आला आहात तर सरकार चालवून दाखवा. जनतेची कामे करा, जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते ते पूर्ण करा, असे आव्हान बोंडे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER