राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीने केली अटक

मुंबई :- पुण्यातील शिवाजीराव भोसले (Shivajirao Bhosale) सहकारी बँकेतील (Co-Operative Bank) सुमारे ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले (Anil Bhosale) यांच्यासह चौघांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) अटक केली आहे. त्यांना ११ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना तुरुंगात पाठवले आहे.

अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेवरील आमदार आहेत. भोसलेंसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने शिवाजी भोसले सहकारी बँकेतील फसवणुकीसंदर्भात कारवाई केली. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बँकेचे दुसरे संचालक सूर्याजी जाधव, सीईओ तानाजी पडवळ, चीफ अकाउंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

सध्या अनिल भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांना २५ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर या घोटाळ्याबाबत ईडीने गुन्हा दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER