खर्चासाठी दागिने विकावे लागले, मुलाकडून कर्ज घेतले; अनिल अंबानी यांची लंडन कोर्टात माहिती

Anil Ambani

मुंबई :  देशातील सर्वोच्च उद्योगपती अनिल अंबानी (Anil ambani) यांना वकिलांची फी भरण्यासाठी दागिने ( jewellery) विकावे लागत आहेत. एकेकाळी राजेशाही आयुष्य जगणारे अनिल अंबानी आज साधे जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे केवळ एक कार आहे. ते पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. ही सर्व माहिती त्यांनी स्वतः लंडनच्या कोर्टात (London court) दिली आहे.

अनिल अंबानी यांनी कोर्टाला सांगितले की, सन २०२० मध्ये जानेवारी ते जून या काळात त्यांनी ९.९ कोटी रुपयांचे दागिने विकले आहेत. यानंतर, त्यांच्याकडे मौल्यवान अशी काहीही वस्तू नाही. लक्झरी कार खरेदी केल्याची अफवा म्हणून माध्यमात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी  स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्याकडे फक्त एक कार आहे, जी ती वापरत आहेत. तत्पूर्वी, लंडन कोर्टाने अनिल अंबानी यांना १२ जूनपर्यंत तीन चिनी बँकांना ५,२८१ कोटी रुपये तसेच सात कोटींचा कायदेशीर खर्च देण्यास सांगितले होते.

यानंतर १५ जून रोजी चीनच्या औद्योगिक व वाणिज्यिक बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात चिनी बँकांनी अनिल अंबानी यांची संपत्ती उघडकीस आणण्याची मागणी केली. यापूर्वी अनिल अंबानी यांनी आपली मालमत्ता उघड केली होती. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचे मूल्य अंदाजे ७४ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रतिज्ञापत्रात अनिल यांना या मालमत्तेत आणखी काही सहभाग आहे का, असेही विचारले होते. कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अंबानी म्हणाले की, रिलायन्स इनोव्हेशन्सना आपण पाच अब्ज रुपयांचे कर्ज दिले आहे.

आणि रिलायन्स इनोव्हेशनमध्ये १.२० कोटी इक्विटी शेअर्सची किंमत नाही. त्यांनी कोर्टाला सांगितले की, कौटुंबिक ट्रस्ट वगळून जगभरातील कोणत्याही ट्रस्टमध्ये त्यांचे कोणतेही आर्थिक हित नाही. कोर्टामध्ये अंबानी यांनी कबूल केले की, एकेकाळी ते भारतात सर्वांत श्रीमंत होते. आपण रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून २०१२-२० मध्ये कोणतीही व्यावसायिक फी घेतली नाही.

अनिल अंबानी यांनी कोर्टात सांगितले की, ‘माझा खर्च खूप कमी आहे. सर्व खर्च पत्नी व कुटुंबातील सदस्य उचलतात.’ ते एक साधे जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नाही. कायदेशीर खर्च पूर्ण करण्यासाठी दागिने विकत आहेत. उर्वरित खर्चासाठी अन्य मालमत्ता विक्रीसाठी कोर्टाकडून आदेश घ्यावे लागतात. मुलाकडून कर्ज घेतल्याची माहिती अंबानी यांनी कोर्टाला दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER