आमच्यासाठी ‘पवार साहेबां’चे खडेबोलसुद्धा आशीर्वादच, पवार कुटुंब एकसंध

Sharad Pawar & Parth Pawar.jpg

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी केलेली सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी प्रकरण असो किंवा जय श्री राम म्हणत अयोध्येतील राम मंदिराला दिलेल्या शुभेच्छा यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी नातू पार्थ अपरिपक्व असून नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचे सांगत पार्थ यांना फटकारले होते. यावर राजकीय क्षेत्रात बुधवारचा दिवस अनेक तर्क वितर्कांसह गाजला. भाजपच्या नेत्यांनी तर पार्थ लांबी रेस का घोडा असल्याचे म्हणत त्यांचे कौतुकही केले होते. मात्र या उद्भवलेल्या परिस्थितीवर बारामतीतराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त झाले.

या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समवेतचे पार्थ पवार यांचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत पवार कुटुंब एकसंध असल्याचा संदेश दिला. विरोधकांच्या पिढ्यांपिढ्या बरबाद होतील, पण त्यांना पवार घराण्याचे राजकारण कधीच समजणार नाही. पवार साहेबांच्या बोलण्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पार्थ पवार यांच्यासमवेत फोटो पोस्ट केलेला फोटो पुरेसा आहे असल्याचे देखील नमूद करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आवर्जून विसरले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER