नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा दावा खरा ठरला, मनसेची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : मंगळवारी रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु होती मात्र आता पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या १०० टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचा आरोप मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.

टीव्ही-९ मराठीशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, आम्ही आधीपासूनच नालेसफाईमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत होतो. आजच्या पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. दक्षिण मुंबईत कधीही पावसाचे पाणी साचत नव्हते. मात्र यावर्षी त्या भागातही पाणी साचले आहे. शिवसेनेची प्रत्येक पावसाळ्यात पोलखोल होत असल्याचं म्हटलं आहे. पालिका प्रशासन काय काम करते हे आजच्या पहिल्याच पावसातून दिसून आल्याची टीकाही देशपांडे यांनी केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला आहे. पालिकेने नालेसफाईची खोटी आकडेवारी दिली. पहिल्याच पावसात त्याची पोलखोल झाली, असा दावा रवी राजा यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button