PCB वर संतप्त मोहम्मद अमीर क्रिकेटमधून निवृत्त झाला, व्यवस्थापनावर केला मानसिक छळाचा आरोप

Mohammad Amir

मोहम्मद अमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चित ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आमिरने PCB आणि टीम मॅनेजमेंटवर आरोप केले आहे.

पाकिस्तानचा स्टार बॉलर मोहम्मद अमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. आमिरने यापूर्वीच कसोटी क्रिकेटला निरोप दिला आहे आणि आता त्याने अनिश्चित ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

आमिरने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती
ट्विटरवर मोहम्मद अमीरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओत आमिरने PCB वर गंभीर आरोप केले आहेत. आमिर म्हणाला, ‘मी सध्या क्रिकेट सोडत आहे, मला वाटत नाही की मी सध्याच्या व्यवस्थापना बरोबर खेळू शकेन.’

PCB वर आमिरने लावले गंभीर आरोप
आमिरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आणि टीम मॅनेजमेंटवर मानसिक छळ केल्याचा आरोप करत म्हणाला, ‘माझ्यावर मानसिक छळ केला जात आहे आणि मी आता हा छळ सहन करू शकत नाही. २०१३ ते २०१५ पर्यंत मी खूप त्रास सहन केला आणि त्यावेळी जे काही घडले मी त्याची शिक्षा भोगली.’

तो म्हणाला, ‘ज्या लोकांनी नेहमी मला पाठिंबा दर्शविला आहे ते म्हणजे (नजम) सेठी साहेब आणि शाहिद आफ्रिदी. कारण बाकीचा संघ आमिरबरोबर खेळू नका असे म्हणत होता. या प्रकाराचे वातावरण तयार झाले होते.’

आमिरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
वयाच्या १२ व्या वर्षी मोहम्मद अमीरने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात प्रवेश केला होता. त्याचबरोबर त्याने इंग्लंडविरुद्ध टी -२० कारकीर्दीची सुरुवात केली. २८ वर्षीय या खेळाळूने पाकिस्तानकडून ३६ कसोटी, ६१ एकदिवसीय आणि ५० टी -२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २५० आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.

पाकिस्तान आणि भारतीय माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातमीनुसार मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मोहम्मद आमिर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याची पुष्टी केली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER