आंद्रे रसेलने २०१८ मध्येही एका सामन्याला कलाटणी दिली होती

Maharashtra Today

आयपीएलमधील (IPL) बुधवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दिलेली झुंज दीर्घकाळ स्मरणात राहील. ज्या संघाची ५.२ षटकांतच ५ बाद ३१ अशी अवस्था होती त्या संघाने शेवटी २०२ धावांपर्यंत मजल मारावी हेच आश्चर्य होते आणि हे आश्चर्य त्यांच्या सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी घडवले होते. हे फलंदाज अनुक्रमे दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल (Andre Russell) व पॕटरसन कमिन्स या तिघांनी तब्बल २०० च्या स्ट्राईक रेटने ८० चेंडूंतच १६० धावांची भर घालून सामना रंगतदार बनवला होता. कार्तिकने २४ चेंडूंत ४०, रसेलने फक्त २२ चेंडूंतच ५४ आणि कमिन्सने ३४ चेंडूंतच नाबाद ६६ धावा फटकावून काढल्या.

आयपीएलमध्ये सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी याआधी भर घातलेल्या सर्वाधिक धावा ११८ होत्या आणि एकूणच टी-२० क्रिकेटमध्ये यापेक्षा अधिक धावा या तीन क्रमांकाच्या फलंदाजांनी केलेला आणखी एकच सामना आहे. कॕरिबियन प्रिमीयर लिगच्या २०१८ मधील सामन्यात त्रिन्बागोविरुद्ध जमैकाच्या के. लुईसने ५१, आंद्रे रसेलने नाबाद १२१ व इमाद वसिमने नाबाद ४ धावा केल्या होत्या आणि या तिघांनी १७५ धावा जोडल्या होत्या.

या प्रकारे या दोन्ही संघर्षपूर्ण सामन्यात आंद्रे रसेल हा एक काॕमन फलंदाज आहे. त्याने त्या सामन्यात नाबाद १२१ आणि आता ५४ धावांची खेळी केली आहे. यामुळेच आंद्रे रसेल खेळपट्टीवर असेल तोवर काहीही होऊ शकते असेच म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button