‘आंदोलनजीवीं’नी शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला केले ‘अपवित्र’

Pm - Farmer Protest

नवी दिल्ली :- देश कोरोनामधून सावरत असला तरी शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढत आहे. सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरूच आहे. दोन महिन्यांपासून शेतकरी व सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. विरोधकांनी यावरून सरकारला घेरले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवर होणाऱ्या आरोपांचे खंडन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज लोकसभेत केले.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय  आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तर काही सदस्यांनी सभात्यागसुद्धा केला. ‘सध्याच्या स्थितीत काँग्रेसची अशी अवस्था आहे की, हा पक्ष स्वत:चे आणि देशाचेही भले करू शकत नाही.’ असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे, असाही त्यांनी टोला लगावला. आंदोलनाच्या नावाखाली उपद्रव करणाऱ्यांवर मोदींनी निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम ‘आंदोलनजीवीं’नी केले, असा आरोपदेखील त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ना खेळणार, ना खेळू देणार… मी खेळ बिघडवणार! नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER