महावितरणच्या प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाला ताला ठोको आंदोलन‌ : प्रा डॉ. एन डी पाटील

प्रा डॉ. एन डी पाटील

कोल्हापूर : राज्य सरकारने घरगुती वीज पुरवठा आणि कृषी पंपाबाबत कार्यवाही केलेली नाही. तातडीने अंतिम निर्णय व अंमलबजावणी न झाल्यास याच्या निषेर्धाथ मंगळवार दि २७ ऑक्टोबर रोजी दुपारी-१२ वाजता राज्यातील महावितरणच्या सर्व मुख्य जिल्हा कार्यालयांना ”ताला ठोको” आंदोलन करणार असल्याचे प्रा डाॅ एन डी पाटील (Dr. N D Patil) यांनी जाहीर केले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याबरोबर ०१जुलै रोजी व्हीडीओ काॅन्फरन्सद्बारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), खासदार धैर्यशील माने, आ.प्रकाश आवाडे, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजेश पाटील, आ. ऋतुराज पाटील, वीज तज्ञ प्रताप होगाडे व विक्रांत पाटील-किणीकर व महावितरणचे वरीष्ठ अधिकारी यांच्यासह बैठक झाली होती. त्यावेळी ऊर्जामंत्री यांनी पेडपेडींग कृषिपंपाच्या वीज जोडण्या सुलभ करण्याकरीता एच व्ही डी एस अंतर्गत वीज जोडण्या देण्याची अट शिथील करुन पूर्वीप्रमाणे लघुदाब वाहिनीवर अथवा रोहित्रावर ज्या ठिकाणी वीज भार उपलब्ध आहे. त्याठिकाणी तात्काळ कृषिपंपाना जोडण्या देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे जाहीर केले होते. ऊर्जामंत्री यांनी सहा महिन्यापुर्वी मागील अधिवेशन काळात याबाबत जाहीर प्रसिध्द पत्रक देखील दिले होते. पण अद्यापही याबाबतच्या अधिकृत सूचना महावितरण कार्यालयास मिळालेल्या नाहीत तसेच राज्यातील सर्व लघु दाब पाणी पुरवठा संस्थांचे दर प्रति युनिट 1.16 पैसे करणार असे देखील ठरले होते त्याची देखील अंमलबजावणी झाली नाही.

आज कोल्हापुर जिल्ह्यातील २०१३-१४ पासून साधारण ७५०० शेतकरी पैसे भरुनही आजही महावितरणच्या वीज जोडणीची वाट पहात आहेत महावितरणकडून गेल्या पाच वर्षात साधारण २०० ते 300 वीज जोडण्या कोल्हापूर जिल्ह्यात जोडली आहेत सांगली 12500,सातारा 3000,इतर जिल्ह्यात व राज्यातही अशीच परिस्थिती आहे, राज्यात अंदाजे 4 लाख शेती पंपाच्या जोडण्या प्रलंबीत आहेत. या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER