आंदोलन : सदाभाऊ खोत निघालेत दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन!

Sadhbhau Kothe - Maharashtra Today

मुंबई : दुधाचे दर कमी झाल्याच्या विरोधात रयत क्रांती संघटनेने आज अनोखे आंदोलन केले. संघटनेचे नेते सदाभाऊ खोत दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन मंत्रालयाकडे निघालेत! पोलिसांची पळापळ झाली. खोत यांचा मोर्चा अडवण्यात आला. आंदोलकांनी घोषणा देऊन सरकारचा निषेध केला.

आज सकाळी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात ‘दुधापेक्षा पाणी महाग, आघाडी सरकारला कधी येणार जाग’ अशा घोषणा देत मोर्चा निघाला. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर खोत यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. दुग्धविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली. सचिवांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिल्याचे खोत यांनी सांगितले.

कारवाई करा
खोत म्हणालेत – आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाईच्या दुधाला १८ – २० रुपये लिटर भाव मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार ३/५ फॅट व ८/५ एसएनएफ नुसार किमान २५ रुपये लिटर दर मिळायला पाहिजे. परंतु या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्था केराची टोपली दाखवत. मात्र दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्था व खाजगी कंपन्यांवर दुग्ध विकास विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. खाजगी दूध संस्थावर व खाजगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात येते!

दुधालाही एमएसपी किंवा एफआरपी असावी
ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये उसासाठी किमान आधारभूत किंमत FRP आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना समान भाव मिळाला पाहिजे. उसासाठी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ७०/३० चा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे दूध उत्पादकांसाठी किमान ८५/१५ चा फॉर्म्युला केला पाहिजे. सध्या कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघामध्ये ८१/१९ चा फॉर्म्युला आहे. १९६६-६७ नंतर संकरीकरणाचा तंत्रज्ञानयुक्त वापर दिसत नाही. गीर, धारपारकर या आमच्या गायी जागतिक ब्रीडनुसार आदर्शवत आहेत, या जातींच्या गाईंचे संगोपन झाले पाहिजे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केली. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी सदाभाऊंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button