आंध्रप्रदेश : रामाची ४०० वर्षे जुनी मूर्ती तोडली

रामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती तोडली

विजयनगरम : आंध्रप्रदेशातील विजयनगरम (Vizianagaram) परिसरात प्रभू रामाची ४०० वर्षे जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडली. या प्रकारणी विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली. भाजपाचे (BJP) नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) म्हणालेत, आंध्रप्रदेशात (Andhra Pradesh) हिंदू मंदिरांवर होत असलेले हल्ले १६ व्या शतकातील गोव्यातील क्रूर सेंट झेविअरच्या हल्ल्यांची आठवण करून देतात.

देवधर यांनी ट्विट केले – “आंध्रप्रदेशात हिंदू मंदिरांवर सतत होत असलेल्या हल्ल्यांवरून तालिबानकडून बामियान येथे तोडण्यात आलेल्या बुद्धाच्या प्रतिमेची आठवण झाली. ही घटना अतिशय भयावह आहे. मंदिरांवरील हल्ल्यांवर जगनमोहन रेड्डी सरकारचं मौन हे त्यांचं समर्थन दाखवत आहे. ”

चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश केलेल्या पवन कल्याण यांनी टीका केली – “एकीकडे अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी रामाची मूर्ती तोडण्यात आली. ”

“त्यांनी ऐतिहासिक मंदिरात चुकीचे कृत्य केले. राज्य सरकारने पीथमपूर, कोंडा बिटरगुन्टा आणि अंतरावेदी या ठिकाणी घडलेल्या घटनांवर गंभीरपणे कारवाई केली नाही. अंतरावेदीमध्ये श्री लक्ष्मी नरसिंहा स्वामी मंदिराचा रथ जाळणाऱ्या आरोपींचा अजून शोध लागला नाही. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही. हिंदूंच्या देवी-देवता आणि मंदिरातील मूर्तींवर होणाऱ्या या हल्ल्यांना काय म्हटलं पाहिजे? हे कोणीही वेडेपणाने केलेले कृत्य नाही, धार्मिक संतुलन गमावलेल्या लोकांनी केले आहे. ” असेही पवन कल्याण म्हणाले.

दरम्यान, पवन कल्याण यांनी अशा घटनांवर गृह मंत्रालयानेही लक्ष द्यावे, अशी विनंती केली आहे. “दीड वर्षांपासून मंदिरे आणि मूर्तींवर हल्ले होत आहेत. मंदिरांवर होणाऱ्या या हल्ल्यांची सीबीआयकडून चौकशी करा. ” अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा निषेध केला. या घटनेसाठी राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER