चंद्राबाबूंना न्यायालयाचा दिलासा; अटक वॉरंट केले रद्द

chandrababu-naidu

नांदेड : बाभळी बंधारा प्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना धर्माबाद न्यायालयाने दिलासा दिला आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. याचबरोबर जो पर्यंत त्यांच्याविरोधात दोषोरोप सिद्ध होत नाही. तो पर्यंत न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही,असेही न्यायालयाने सांगितले आहे. धर्माबाद बाभळी बंधारा प्रकरणात चंद्रबाबू नायडूसह १५ जणांवर जमावबंदीचे आदेश धुडकावून लावण्याचा आरोप आहे.

नांदेड येथील बहुचर्चित बाभळी बंधारा प्रकरणावरून आंध्रप्रदेश व महाराष्ट्र यांच्यात पाणी प्रश्नावरून वाद निर्माण झाला होता.त्यावेळी नायडू यांनी बाभळी बंधारा उडवून देण्याचे धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर बाभळी बंधाराकडे जाण्यास जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, नायडू यांनी सर्व आदेश धुडकावून बाभळी बंधाराकडे जाण्याचे प्रयत्न केला होता.